SSC Result 2022 : आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा; मुख्यमंत्री ठाकरेंनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा | पुढारी

SSC Result 2022 : आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा; मुख्यमंत्री ठाकरेंनी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा असा संदेश देत, दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी  शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ” शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. त्यामध्ये उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!”असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

हेही वाचा :

 

Back to top button