Rajya Sabha Election 2022 Live : राज्यसभेसाठी २८५ आमदारांनी केले मतदान

मुंबई; पुढारी ऑनलाईन
Rajya Sabha Election 2022 Live : सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी मतदान झाले. सकाळी ९ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाची वेळ ४ पर्यंत होती. पण त्यापूर्वीच बहुतांश आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यसभेसाठी एकूण २८५ आमदारांनी मतदान केले. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने परवानगी नाकारल्याने त्यांना राज्यसभेसाठी मतदान करता आले नाही. एमआयएमने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. तर काँग्रेसने आपल्या उमेदवाराला ४२ मते तर दोन मते शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना दिली. यामुळे संजय पवार यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आमचा विजय निश्चित असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपकडे पुरेशी मते नाहीत. त्यामुळे दोघांची मदार छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांवर आहे. या निवडणुकीत अपक्षांची मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ दिसून आली.
Rajya Sabha Election 2022 Live अपडेट :
आमच्या उमेदवाराला ४२ मते दिली. संजय पवार यांना २ मते दिली- नाना पटोले
राज्यसभेसाठी दुपारी १ पर्यंत २६० आमदारांचे मतदान
दुपारी १२.३० पर्यंत २३८ आमदारांचे मतदान
Mumbai | Maharashtra CM Uddhav Thackeray arrives at the Legislative Assembly as voting in #RajyaSabhaElection2022 is underway pic.twitter.com/AIfBXRLJV1
— ANI (@ANI) June 10, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी विधानभवनात दाखल
चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखल
नवाब मलिकांना मतदानासाठी तूर्त परवानगी नाही
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना मतदानासाठी तूर्त परवानगी मिळालेली नाही. मतदानासाठी जामीन देण्याची मागणी करणारी त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आली आहे. याचिकेत सुधारणा करुन नव्याने याचिका दाखल करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. जामीन मिळत नसेल तर मतदानाची परवानगी द्या, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला होता.
राज्यसभा निवडणूक – विधानभवन येथे सकाळी ११.३७ वाजेपर्यंत १८० आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पहिल्या दीड तासांतच ५० टक्के मतदान पूर्ण
महाराष्ट्र : पहिल्या दीड तासांतच ५० टक्के मतदान पूर्ण झाले आहे. आतापर्यंत १४३ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ६० हून अधिक आमदारांनी आणि काँग्रेसच्या २० आमदारांनी मतदान केले आहे.
Maharashtra | 50% of polling has been completed in the first 1.5 hours. 143 MLAs exercised their right to vote. More than 60 BJP MLAs and 20 Congress MLAs have cast their votes for Rajya Sabha elections: Sources
— ANI (@ANI) June 10, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसने मतांचा कोटा बदलला
काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रफुल्ल पटेल यांच्या मतांचा कोटा बदलला आहे. दगाफटका नको म्हणून पटेल यांना ४२ ऐवजी राष्ट्रवादी ४४ मते देणार आहे. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एका उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीची ४१ मते लागणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्या उमेदवारांना ४२ मते देऊन उर्वरित अतिरिक्त मते शिवसेनेच्या संजय पवार यांना देण्याचे ठरले होते. मात्र निवडणूकीतील चुरस पहाता काँग्रेसनंतर राष्ट्रवादीनेही आपल्या उमेदवाराला ४४ मते देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे संजय पवार यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून मिळणारी चार मते कमी होणार आहेत.
काँग्रेस हायकमांडने राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधील इम्रान प्रतापगढी यांची उमेदवारी लादल्याने काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी आहे. ऐनवेळी काही दगाफटका होऊ नये, यासाठी काँग्रेसने आपली सगळी ४४ मते प्रतापगढी यांना देण्याचा निर्णय मतदानाच्या अखेरच्या क्षणी घेतला आहे.
शिवसेनेचे आमदार मतदानासाठी विधानभवनात दाखल
सेना आमदारांची जोरदार घोषणाबाजी
राज्यसभा निवडणूक : आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या : संजय राऊत
भाजपचे लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळक मतदानासाठी ॲम्ब्युलन्सने रवाना
हे ही वाचा :
राज्यसभा निवडणूक : काँग्रेसच्या ‘प्रतापी’ निर्णयाने शिवसेना अडचणीत
राज्यसभा निवडणूक : आघाडीत बिघाडी या भाजपने पसरवलेल्या बातम्या : संजय राऊत
राज्यसभा; जिल्ह्यातील 8 आमदार ‘महाविकास’कडे, दोन भाजपकडे
राज्यसभा निवडणूक : राष्ट्रवादीनेही मतांचा कोटा बदलला, संजय पवारांची चार मते कमी होण्याची शक्यता