पिंपरी: घरातून रुसून गेलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार | पुढारी

पिंपरी: घरातून रुसून गेलेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी : वडिलांनी मारले म्हणून मध्यरात्री बारा वर्षीय मुलगी घर सोडून गेली. दरम्यान, ती झाडात लपून बसली असताना तिथे आलेल्या तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार दोन वर्षांपूर्वी लेबर कॉलनी, चाकण येथे घडला. याप्रकरणी पीडित 12 वर्षीय मुलीने याप्रकरणी 7 जून 2022 रोजी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, तीन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीला अज्ञातांनी पळवून नेल्याबाबत चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी मध्य प्रदेश येथील किलोडमध्ये 22 एप्रिल रोजी सापडली. दरम्यान, तिला ताब्यात घेऊन चाकण पोलिस ठाण्यात आणले.

तिच्याकडे चौकशी केली असता तिला कोणीही पळवून नेले नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर मुलीच्या पालकांनी देखील तक्रार गैरसमजुतीने दिली असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ‘त्या’ मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले. दरम्यान, तिथे तिने वैद्यकीय अधिकार्‍यांना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी तिला मारले म्हणून ती रुसून झाडात जाऊन बसली. तिथे हा प्रकार घडला.

हेही वाचा 

एकाच दिवशी चोरीच्या अठरा घटना; अकरा लाख 57 हजार 450 रुपयांचा माल चोरीला

विधानपरिषद निवडणूक : सदाभाऊ खोत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात, भाजपकडून पाठिंबा

विधान परिषद निवडणूक : आ. पाटील यांच्याकडून वैयक्‍तिक भेटींवर भर

Back to top button