file photo
file photo

मुंबई : २२ वर्षीय तरुणाने स्वत:च्या आईची हत्या करून केला आत्महत्येचा प्रयत्न

Published on

भांडुप ; पुढारी वृत्तसेवा : मुलुंड मध्ये एका २२ वर्षीय तरुणाने स्वतः च्या आईची हत्या करून लोकल खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि.९) मुलुंडमध्ये घडली. छाया महेश पांचाळ (वय ४६) असे मृत महिलेचे नाव असून तिची हत्या तिचाच २२ वर्षीय मुलगा जय याने केली आहे.

मुलुंडच्या वर्धमान नगर मध्ये पांचाळ कुटुंबीय रहात हाेते. शनिवारी संध्याकाळी मुलुंड पोलिसांना या ठिकाणी त्यांचा घरातून रक्त येत असल्याचा माहिती फोनद्वारे मिळाली. यावेळी मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घर उघडून पाहताच त्यांना घरात छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत मृत पडलेल्या आढळून आल्या.

पोलिसांना एक गुजराती भाषेत लिहलेली चिट्ठीदेखील आढळली. जी चिठ्ठी छाया यांचा मुलगा जय याने लिहिली होती. त्यामध्ये त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र त्यानंतर त्याने मुलुंड रेल्वे स्थानकात लोकल खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वडिलोपार्जित प्रॉपर्टी वरून हे दोघे माता पुत्र डिप्रेशनमध्ये असल्याचे छाया यांच्या पतीने पोलिसांना सांगितले आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला. पाेलिसांनी या गुन्हाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news