कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोडवर ट्रकने दुचाकीस्‍वाराला चिरडले - पुढारी

कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोडवर ट्रकने दुचाकीस्‍वाराला चिरडले

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोडवर शुक्रवारी दुपारी दुचाकीवरील तरुणाचा ट्रकखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. मंधाता ब्रीजेश्वरनाथ मिश्रा (२८ ) असे त्‍याचे नाव आहे.

मंधाता हा बिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालयाजवळील ताराबाई भोईर चाळीत राहत हाेता.

आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ताे दुचाकीवरून कल्याण पूर्वेकडील काटेमानिवलीच्या दिशेने जात होता.

गुंजाई चौकात अवजड ट्रकला ओव्हरटेक करत असताना अचानक दुचाकी घसरली.

ताे ट्रकच्या मागील चाकाखाली फेकला गेला. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या अपघाताची नाेंद झाली असून, गुन्हा  ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button