संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केली, अजूनही तीच मागणी करत आहे | पुढारी

संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केली, अजूनही तीच मागणी करत आहे

यवतमाळ; पुढारी ऑनलाईन : पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर मंत्रिपद गमावलेल्या संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे दाखल झाली आहे. इतकच नाही, तर अजूनही तीच मागणी करून छळत असल्याचा आरोपही त्या पीडित ३० वर्षीय महिलेने केला आहे.

याबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी पीडिताने तक्रार दाखलेल्या प्रतचा फोटोही पोस्ट केला आहे.
त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिवसेना आमदार माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असंही त्यात म्हटलं आहे.

त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत संजय राठोड यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांनी म्हटले आहे की, शिवसेनेच्या संजय राठोड यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मुळात ज्याच्यामुळे एका भगिनीनी जीव दिला त्याला ढळढळीत पुरावे असतांनाही अजूनही कुणाच्या सांगण्यावरून बेड्या ठोकल्या गेल्या नाहीत तो अजूनही मोकाट कसा फिरतोय? की आपण आणखी महिलांवर अत्याचार होण्याची वाट पहातोय ??

पुजा चव्हाण आत्महत्या : ‘त्या’ ऑडीओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच!

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये दोन व्यक्ती दरम्यान झालेले संभाषण व्हायरल झाले होते. बंजारा व इतर बोली भाषेत हे संभाषण होते. त्यावरून विविध प्रकारचे तर्क वितर्क लढविले जात असतानाच या संभाषणातील एक आवाज माजी मंत्री संजय राठोड यांचा असल्याचे न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या (फॉरेन्सिक लॅब) अहवालातून समोर आले आहे.

याला पुणे पोलिसांनी अधिकृत दुजोरा देत दोन महिन्यापूर्वीच हा अहवाल आम्हाला प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. ७ फेब्रुवारी २०२१ ला पूजा चव्हाणने पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्याच्या राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

या प्रकरणाचा संदर्भ थेट विद्यमान सरकारमधील तत्कालीन वनमंत्री राठोड यांच्याशी जोडण्यात आल्यामुळे, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

विरोधी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शेवटी राठोड यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यातच आता पुन्हा राठोड यांना मंत्रीपद मिळण्याच्या चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात ९० मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचं समोर आले आहे.

दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना फॉरेन्सिक रिपोर्ट देण्यात आला आहे.

पुजाच्या आत्महत्येपूर्वी सुमारे ९० मिनिट पूजा हीच राठोड यांच्याशी फोनवर बोलणं झालं असल्याची माहितीसमोर आली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button