वैफलग्रस्त मनसेला उपचाराची गरज : संजय राऊत  | पुढारी

वैफलग्रस्त मनसेला उपचाराची गरज : संजय राऊत 

पुढारी ऑनलाईन डेस्क :  वैफलग्रस्त मनसेला उपचाराची गरज आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज व्‍यक्‍त केले.पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात  मनसे अघ्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. यानंतर राऊत  प्रसारमाध्यमांशी बोलत हाेते.  

गेले काही दिवस हनूमान चालिसावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यात वाद सुरु आहे. आणि नुकतेच राणा दाम्पत्य आणि संजय राऊत हे लडाख दौऱ्यादरम्यान एकत्र आले होते. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, हे सगळे ढोंगी आहेत. याला प्रत्युतर देत संजय राऊत म्हणाले, वैफलग्रस्त मनसेला उपचाराची गरज आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेनेवर  बोलू नये. आमच्या हिंदूत्वावर बाोलायला, ते कधी हिंदूत्ववादी झाले. आमचं हिंदूत्व  आमच्याजवळ आहे. आमचं हिंदूत्व तेजाने तळपत राहील. त्यावर कोेणी बोलू नये. आता भगवी शाल पांघऱल्याने तुम्ही  हिंदूत्ववादी होत नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला. 

वैफलग्रस्त मनसेला उपचाराची गरज आहे. ही निराशा, उदासीनता आहे ती बाहेर पडत  आहे. या लोकांना उपचाराची गरज आहे. आता दूकानात काही खपत नाही म्हणून ते हिंदूत्वावर बोलतात.  मातोश्रीने राज ठाकरे यांनाही मोठ केलं आहे. हे त्यांनी विसरु नये. राज ठाकरे यांनी आपला इतिहास तपासून घ्यावा. त्यांनी आपल्या स्वत: च्या पक्षाबद्दल बोलावं, असे आवाहनही त्‍यांनी केले.  

राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात बोलताना म्हणाले,  सहाव्या जागेसाठी अद्याप कोणताही अजुन निर्णय नाही. 

हेही वाचलंत का? 

Back to top button