Mumbai : मालाडमध्ये इमारतीची गच्ची कोसळल्याने 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू | पुढारी

Mumbai : मालाडमध्ये इमारतीची गच्ची कोसळल्याने 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

मालाड ; पुढारी वृत्तसेवा : मालाडमध्ये इमारतीच्या गच्चीचा काही भाग पडल्याने 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजकुमार सोनी असे या तरुणाचे नाव आहे. बांधकामाच्या साईटवर ही दुर्घटना घडली. (Mumbai)

मालाड पश्चिमेतील झकेरीया रोड येथे खासगी विकासक कर्मवीर यांची इमारत जालान निवासचे बांधकाम सुरू होते. सकाळी 11.15 वाजताच्या दरम्यान गच्चीच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू असताना काही भाग खाली पडला. हा भाग तळमजल्यावर असलेल्या इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानात काम करणाऱ्या 26 वर्षीय तरुणाच्या डोक्यावर पडला. (Mumbai)

या दुर्घटनेत बांधकाम सुरू असताना गच्चीची भिंत पडल्याने संरक्षणासाठी बांधलेली जाळी तुटली. ती खाली शौचालयमध्ये जात असलेला राजकुमार याच्या डोक्यावर पडल्याने तो जागीच खाली कोसळला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बांधकाम साईटवर उपस्थित कामगारांनी त्याला मालाड एसव्ही रोड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळातच या राजकुमार याला मृत घोषित करण्यात आलं.

घटनेची माहीती मिळताच पोलीस व पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघाती गुन्हा नोंदकरून पोलीस पुढील तपास करत आहेत. संध्याकाळ होत आली तरी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी खासगी रुग्णालयातून पालिकेच्या रुग्णालयात पाठवण्यात आला नाही. शवविच्छेदनाकरिता इतका विलंब का झालं या बाबत अजून मिळालेली नाही. दरम्यान या इमारतीत काम करणारे मजूर घाबरून तिथून पसार झाले असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे.

हेही वाचा

Back to top button