आज रात्री कोरोना निर्बंध उठणार? उद्धव ठाकरे ८ वाजता साधणार संवाद | पुढारी

आज रात्री कोरोना निर्बंध उठणार? उद्धव ठाकरे ८ वाजता साधणार संवाद

मुंबई , पुढारी ऑनलाईन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (ता. ८) रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील जनतेशी सोशल मीडियावरून कोरोना निर्बंध उठवण्याबाबत संवाद साधणार आहेत. राज्यातील विविध ठिकाणचे कोरोना निर्बंध करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद साधणार आहेत.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे अनेक ठिकाणी निर्बंध कायम आहेत.

मात्र, पुण्यातील दुकाने उघडण्याबाबत आणि मुबंईतील लोकल सुरू करण्याबाबत भाजप आक्रमक आहे.

त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. मात्र, एका ठराविक संख्येवर येऊन हा आकडा थांबला आहे.

मुंबईच्या लोकलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना असलेली प्रवास बंदी यापुढील काळातही कायम राहणार की त्यात शिथिलता असणार याचा निर्णयही आज मुख्यमंत्री देतील.

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार का? याबाबत सरकारचे काय धोरण असेल याबाबतही ठाकरे सांगू शकतात.

आज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी समिती सभागृहात शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या प्रमुख संघटनांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा केली.

या बैठकीस संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, डॉ. पी. व्ही शेट्टी, रवी शेट्टी, राकेश शेट्टी, सुकेश शेट्टी आदी उपस्थित होते.

राज्याती पॉझिटिव्हिटी रेट पाहून त्या त्या ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना आकडेवारी कमी आढळत आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

मुंबईतील लोकलमध्ये सामान्यांना प्रवेश द्यावा यावरून भाजप आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे.

तसेच पुण्यात शिथिलतेवरून राजकारण सुरू असल्याचा आरोप केला जात आहे.

Back to top button