Jitendra Awhad : ‘गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा!’

Jitendra Awhad : ‘गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा!’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : वैशाख वणव्यात इंधन दरवाढीमुळे नागरिक होरपळत असतानाच आता घरगुती गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे नागरिक मेटाकुटीला आला आहे. आता त्यात गॅस दरवाढीची ठिणगी पडली आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. यावरून आता तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी गॅस दरवाढीवरून टीका करताना आता गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा, असा खोचक सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

१४.२ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आजपासून घरगुती सिलिंडरची किंमत ९९९.५० रुपये झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड  (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत घरगुती गॅसचा भाव परत वाढला, गॅसचे वाढलेले दर भोंग्यांवरून जाहीर करा, असे म्हटले आहे.

दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा एकदा महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच जनता हैराण असतानाच सिलिंडरच्या दरात ही वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरवाढीमुळे भारतातील सर्वसामान्यांच्या त्रासात भर पडणार आहे.

इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यात आता गॅस महागला आहे. याआधी व्यावसायिक सिलिंडर महाग झाला होता. याआधी व्‍यावसायिक सिलिंडरच्‍या किंमती १०२ रुपयांनी वाढल्‍या होत्या. एप्रिल महिन्‍यात या किंमतीमध्‍ये २६८ रुपयांनी वाढ झाली होती. त्यात पुन्हा मे महिन्याच्या सुरुवातीला त्यात वाढ झाली होती. एकीकडे व्‍यावसायिक सिलिंडरच्‍या किंमती वाढल्‍या असताना आता घरगुती सिलिंडरच्‍या किंमतीमध्‍ये वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे घरगुती बजेट कोलमडले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. १ मे रोजी, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १०२.५० रुपयांनी वाढून २३५५.५० रुपये झाली, जी पूर्वी २२५३ रुपये होती. तसेच, ५ किलोच्या एलपीजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत ६५५ रुपये करण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news