राज्य सरकार मुस्कटदाबी करतंय : प्रविण दरेकर | पुढारी

राज्य सरकार मुस्कटदाबी करतंय : प्रविण दरेकर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात प. बंगाल पॅटर्न राबण्याचा प्रयत्न केला जात असून, राज्य सरकार आपल्या अधिकारांचा वापर करून मुस्कटदाबी करत आहे, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दरेकर यांनी हे वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे हे कोणाच्या सांगण्यावरून नाही तर त्यांची ती स्वत:ची भूमिका आहे आणि ते स्वत:ची भूमिका ठामपणे मांडतात. देशात लोकशाही असताना देखील स्वत:चे मत मांडणे येथे गुन्हा ठरवला जात आहे. राणा दाम्पत्य आणि राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करून राज्य सरकार मुस्कटदाबी करतंय, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले.

भाजप भूमिकेवर ठाम

आम्ही चार पाऊल पुढे टाकण्यासाठी एक पाऊल मागे घेतोय. सत्ताधाऱ्यांना राज्यात शांतता हवी की दंगल हे ठरवावं. भाजपची भोंग्यांविषयीची भूमिका आजही तीच आहे. यूपी मध्ये @myogiadityanath यांनी भोंगे उतरवले त्यावेळी सर्व स्तरावरून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी याला पाठिंबा दिला. त्यामुळे भोंगे उतरवण्याची आमची भूमिका आजही ठाम असल्याचे दरेकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button