Photo : नाशिकमध्ये ईदचा उत्साह ; दोन वर्षानंतर ईदगाह मैदानावर नमाज पठण

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद निमित्ताने नाशिकमधील ईदगाह मैदानावर तब्बल दोन वर्षानंतर सामूहिक नमाज पठण करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण करीत देशात एकता व अखंडता टिकून राहावी तसेच देशाच्या प्रगतीसाठी अमन, शांती कायम राहावी व देशाची प्रगती व्हावी, यासाठी प्रार्थना केली. (PHOTO)

ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येेने मुस्लिम बांधव जमले होते.

नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकाला ईद मुबारक असे म्हणत व गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. यामध्ये चिमुकल्यांचाही मोठा सहभाग दिसून आला.
यंदा पवित्र रमजान महिन्याचे पूर्ण 30 रोजी झाल्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना खा. हेमंत गोडसे देखील उपस्थित होते.
