राज ठाकरेंच्या भाषणावरील कारवाईसाठी सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर | पुढारी

राज ठाकरेंच्या भाषणावरील कारवाईसाठी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज ठाकरेंच भाषण हे प्रक्षोभक होते. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेतील भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून घेऊन कारवाई करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. राज्यातील जनतेने शांतता राखावी. कायदा व सुव्यवस्थेचं पालन सर्वांनी करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केले. आम्ही परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत, असे त्यांनी पुणे येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

कुणी कुणाबाबत बोलावं हे मनसे आणि भाजपने वाटून घेतलं आहे. राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचे प्रयत्न विरोधकांचे चालू आहेत. देशात जाणीवपूर्वक ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. जेम्स लेनचा मुद्दा पुन्हा का काढला जात आहे, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मी फक्त मशिदीवरील भोंग्यांना पर्याय दिला आहे. तुम्ही भोंगे काढले नाही तर हनुमान चालिसा लावू, जर भोंग्यांना धार्मिक रंग दिला, तर आम्हीदेखील तसेच उत्तर देऊ. आमची इच्छा नसताना टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. सगळेच भोंगे बेकायदेशीर आहेत, हे लक्षात ठेवा. युपीमध्ये भोंगे उतवले जातात, तर महाराष्ट्रात का नाही? ४ तारखेनंतर आम्ही अजिबात ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदीवर भोंगे लागतील, तिथे हनुमान चालीसा दुप्पट आवाजाने लावणार.”, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. ते औरंगाबाद सभेत बोलत होते.

हेही वाचा

Back to top button