

पुढारी ऑनलाईन
Gold prices updates : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. पण अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या दरात तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचा परिणाम देशातील सराफा बाजारात दिसून येत आहे. यामुळे देशातील सराफा बाजारात सोने प्रति १० ग्रॅम ५२ हजार रुपयांवर पोहोचले आहे. तसेच चांदीही महागली आहे.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर आज सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर ०.५६ रुपयांनी वाढला. दरम्यान, सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याने ५२ हजारांचा टप्पा पार केला. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोने ५२,००३ रुपये, २३ कॅरेट सोने ५१,७९५ रुपये, २२ कॅरेट सोने ४७,६३५ रुपये, १८ कॅरेट सोने ३९,००२ रुपये आणि १४ कॅरेट सोने ३०,४२२ रुपयांवर पोहोचले आहे. चांदी प्रति किलो ६४,७५० रुपयांवर गेली आहे. काल गुरुवारी सोन्याचा दर ५१,५२६ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज वाढ होऊन सोन्याने ५२ हजारांचा टप्पा पार केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी दरात तेजी आली आहे. एक दिवस आधी सोन्याचा भाव प्रति औंस १,९०० डॉलरच्या खाली आला होता. पण आज त्यात तेजी दिसून आली. अमेरिकेतील बाजारात सोन्याचा भाव ०.६३ टक्के वाढून प्रति औंस १,९०७ डॉलरवर पोहोचला. चांदीही वधारली आहे. चांदीचा दर १.०९ टक्के वाढून प्रति औंस २३.४३ डॉलरवर गेला आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)
सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
हे ही वाचा :