भाजपच्‍या 'पोलखोल' रथाची तोडफोड : प्रवीण दरेकर यांचे पोलिस स्‍टेशनसमोर ठिय्‍या आंदोलन | पुढारी

भाजपच्‍या 'पोलखोल' रथाची तोडफोड : प्रवीण दरेकर यांचे पोलिस स्‍टेशनसमोर ठिय्‍या आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी शिवसेनेचा भ्रष्‍टाचाराचा पोलखोल करण्‍यासाठी भाजपने पोलखोल अभियान सुरु केले आहे. मात्र सोमवारी सायंकाळी पोलखोल अभिनयातील रथाची अज्ञातांनी तोडफोड केली. याप्रकरणातील दोषींवर तत्‍काळ कारवाई करण्‍यात यावी, या मागणीसाठी आज विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी चेंबूर पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्‍या आंदोलन केले. दोषींवर कारवाई न झाल्‍यास आंदोलन सुरुच ठेवणार असल्‍याचा इशारा त्‍यांनी दिला आहे.

भाजपच्‍या रथाची तोडफोड करणार्‍यांवर कारवाई करा, याप्रकरणी गुन्‍हा दाखल करा, अशी मागणी करत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर चेंबूर पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्‍या आंदोलन केले. मुंबईत सर्वत्र सीसीटीव्‍ही आहेत. रथयात्रेच्‍या तोडफोडीचेही सीसीटीव्‍ही फुटेज असणार आहे. मात्र ते फुटेज गायब होण्‍याची भीती आहे. पोलिसांवर दबाव आहे. पोलिसांनी सरकारच्‍या दबावात काम करु नये, असेही ते म्‍हणाले.

रथावर दगडफेक करण्‍यात आली. रथाच्‍या काचा फोडण्‍यात आला. गुंडाना हाताशी धरुन आमचे पोलखोल आंदोलन दडपण्‍याचा हा प्रयत्‍न आहे. आम्‍ही या दडपशाहीला जशास तसे उत्तर देवू, असेही दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा :

 

 

Back to top button