फडणवीसांचा सुद्धा राज ठाकरेंच्या ‘सुरात सूर’ ! म्हणाले, जातीचे राजकारण शरद पवारांचा जुना ट्रॅक | पुढारी

फडणवीसांचा सुद्धा राज ठाकरेंच्या 'सुरात सूर' ! म्हणाले, जातीचे राजकारण शरद पवारांचा जुना ट्रॅक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे पाडव्याला आणि नंतर त्याची उत्तर सभा घेऊन विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला होता. त्यांनी राष्ट्रवादीवर जातीयवादी राजकारणाचा आरोप करत बाबासाहेब पुरदरेंवर स्तुतीसुमने उधळली होती. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळले आहेत. जातीचे राजकारण करणे हा शरद पवारांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड असल्याचा आरोप केला आहे.

त्यांनी ट्विटरवर ट्विटची मालिका करत शरद पवारांनी मतांसाठी लांगुलचालन केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी द काश्मीर फाईल्स वरून बदललेल्या भूमिकेवरून अजिबात आश्चर्य वाटतं नसल्याचेही ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी बदललेली भूमिका त्यांना साजेशी असल्याचे म्हटले आहे. तुष्टीकरणाचे धोरण आणि राजकारण तसेच जातीय धुव्रीकरण करणे हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड असल्याची टीका केली आहे. त्यांनी टीका करताना तत्कालीन संदर्भांच्या बातम्यांच्या लिंकही शेअर केल्या आहेत.

नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रियेवरूनही फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. त्यांनी इशरत जहाँ प्रकणाची सुद्धा लिंक शेअर केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, सन २०१३ मध्ये त्यांनी जाहीरपणे म्हटले की, इशरत जहाँ निर्दोष आहे. फक्त तिला निर्दोष न म्हणता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून तिला मदतीचा हात देण्यात आला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यावेळी सत्तेत असताना आयबीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी आझाद मैदानात झालेल्या हिंसाचारावरूनही शरद पवार यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. अमर जवान ज्योतीची मोडतोड करण्यात आली, त्यावेळी राष्ट्रवादीकडे गृहखाते होते, रझा अकादमीला झुकते माप देत मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुस्लीम आरक्षणावरूनही टीका

घटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नसतानाही राष्ट्रवादीकडून मुस्लीमांना आरक्षण देण्याचा प्लॅन आहे. संवैधानिक मुल्यांच्या वर व्होट बँकेसाठी अशा पद्धतीने राजकारण करणे ही लाजीरवाणी बाब असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. कोणाला पराभूत करायचे हे अल्पसंख्यांकांच्या हातात असते यावरून त्यांनी निशाणा साधला आहे. हिंदू दहशतवाद हा शब्दप्रयोग कोणी पहिल्यांदा केला अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button