‘सिल्व्हर ओक’ हल्‍लाप्रकरण : गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्‍यायालयीन काेठडी

‘सिल्व्हर ओक’ हल्‍लाप्रकरण : गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्‍यायालयीन काेठडी
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद मपवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानावरील हल्‍ला प्रकरणी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना आज पोलिस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्‍यायालयीन काेठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता सदावर्ते यांना न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे.

भुलाभाई देसाई मार्गावरील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानात शुक्रवारी (दि. ८) दुपारी घुसलेल्या 109 आंदोलनकर्त्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून गावदेवी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह एकूण 110 जणांना अटक केली होती.

या प्रकरणी सदावर्ते यांना सुरुवातीला दाेन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्‍यात आली होती. यानंतर पाेलीस काेठडीत दाेन दिवसांची वाढ करण्‍यात आली. आज याची मुदत संपली. त्‍यांना न्‍यायालयात हजर करण्‍यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी न्‍यायालयात सीसीटीव्‍ही फुटेज सादर केले. सदावर्ते यांना आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी द्‍या, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. युक्‍तीवादानंतर न्‍यायालयाने त्‍यांना १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे सदावर्ते यांना आता न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज सादर करता येणार आहे.

सदावर्तेंना सातारा पोलिस घेणार ताब्‍यात, पत्‍नी जयश्री पाटील सहआरोपी

१७ एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांनी कारागृहातून सदावर्ते यांचा ताबा घ्‍यावा, अशी परवानगी न्‍यायालयाने आज दिली आहे. सातार्‍यातील सदावर्ते यांच्‍याविराेधात दाखल करण्‍यात आलेल्‍या गुन्‍ह्यात  त्‍यांच्‍या पत्‍नी जयश्री पाटील या सहआरोपी आहेत, अशी माहिती सरकारी वकील प्रदीप घरात यांनी दिली.

अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात जुना गुन्हा दाखल होता. त्याप्रकरणी सातारा पोलीस त्यांना मुंबईतून ताब्यात घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर त्यांनी बेताल वक्तव्य केले होते.तेढ निर्माण होईल असे वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एकाने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली होती. साधारण दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झाली नव्‍हती. आता याप्रकरणी सातारा पोलिस त्‍यांना ताब्‍यात घेणार आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news