केंद्र सरकारनेही इंधन दर कमी करावेत : अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्‍युत्तर | पुढारी

केंद्र सरकारनेही इंधन दर कमी करावेत : अजित पवारांचे फडणवीसांना प्रत्‍युत्तर

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क

राज्य सरकार राज्यात इंधन दर का कमी करत नाही, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रत्‍युत्तर  दिले. ते म्हणाले, “पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत असा प्रश्न असेल तर केंद्रानेही ते दर कमी करावे. आमच्यापेक्षा जास्त टॅक्स केंद्राचे आहेत.” ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. परंतु, काही जणांकडून विपर्यास करण्याचा प्रयास सुरु आहे. शरद पवार यांनी त्यांना जे काही वाटतयं ते त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यासमोर आम्ही छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित दिसत नाही, असेही ते म्‍हणाले.

गॅसच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गॅसवरील कर कमी केला आहे. असेही त्यांनी नमूद केलं. पवार यांनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं आहे.

हेही वाचलं का?

Back to top button