

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरेंना २०१९ च्या निवडणूकीच्या निकालानंतर साक्षात्कार झाला की, सेना-भाजपमध्ये अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ ठरला होता. तर मग कोणत्याही सभेत याबद्दल का सांगितले नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने घेतलेल्या जाहीर सभेत राज ठाकरे बोलत होते.
२०१९ ला पहिल्यांदा शपथविधी झाला आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या जेलमध्ये गेलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा मंत्री केले गेले. निवडणूकीपुर्वी बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यायचे आणि नंतर भ्रष्ट्राचार करत बसायचे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत सांगत आहेत की, मला अटक करा असे म्हणाले होते त्यावर राज ठाकरे यांनी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले आहेत की, कुटुंबीयांना सांगा महापालिकेत जाऊ नका, सर्वांना माहिती आहे की, महापालिकेतून किती टक्केवारी घेतली जात आहे.
मी अयोध्येला जाणार पण सध्या तारिख सांगत नाही. हिंदू-मुसलमान दंगलीमध्ये फक्त हिंदू असतो. १५ ऑगस्टला फक्त तो भारतीय होतो. हिंदू-मुस्लीम दंगलीमध्ये फक्त हिंदू असतो. १५ ऑगस्टला तो फक्त भारतीय असतो. देशात अनेक ठिकाणी मदरसे सुरू आहेत य़ा मदरशांमध्ये काय सुरू आहे? हे आपल्याला माहिती नसतं. हि लोक पाकिस्तान मधून आलेले आहेत. उद्या आपल्या देशाचाही पाकिस्तान करतील. मस्जिदींवर भोंगे कशाला हवे आहेत. मस्जिदीवरील भोंगे उद्या बंद झाले नाहीत तर मस्जिदीसमोर दुप्पट स्पिकर लावून हनुमान चालिसा लावणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी सरकार आमदारांनी घरी वाटत आहे. आमदारांना घरी कशाला हवी आहेत? ठीक आहे आमदारांना घरी द्या आणि त्याबदल्यात आमदारांचे फार्म हाऊस ताब्यात घ्या असे राज ठाकरे म्हणाले आहेत.