Uddhav Thackeray : शिवसेनेचेच सैनिक पुढे येऊन लढतात; राष्ट्रवादीची भाजपविरोधात सॉफ्ट भूमिका मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी

Uddhav Thackeray : शिवसेनेचेच सैनिक पुढे येऊन लढतात; राष्ट्रवादीची भाजपविरोधात सॉफ्ट भूमिका मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष केले जात आहे. परंतू सत्तेत महत्वाचा घटक पक्ष राष्ट्रवादी पक्ष भाजपबाबत मवाळ भूमिका घेत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे, असे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.  (Uddhav Thackeray)

१३ मार्च रोजी, मुंबई पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना सायबर विंगच्या बीकेसी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले; परंतू गृहमंत्रालयाकडून आपला पूर्वीचा निर्णय बदलत. फडणवीस यांचा जबाब त्यांच्या मलबार हिल येथील निवासस्थानी नोंदवला. यावर शिवसेनेतील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीकडे गृहखाते असूनही पोलीस फडणवीसांच्या निवासस्थानी जात जबाब घेतात ही बाब शिवसेनेला पटलेली नाही.

Uddhav Thackeray : अजित पवार यांची माध्यमांसमोर मवाळ भूमिका

भाजपला सडेतोड उत्तर देणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना फेब्रुवारीमध्ये ईडीकडून अटक झाली. यावर शिवसेना नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर हल्लाबोल केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर मवाळ भूमिका घेत दोन्ही बाजूंनी शांत होण्याची वेळ आली आहे. काही गोष्टी नियंत्रणाबाहेर जात आहेत त्या थांबवण्याची गरज असल्याचे म्‍हटलं.

गेल्या वर्षी भाजपच्या १२ आमदारांना सभापतींना शिवीगाळ केल्याचा आरोप करून सभागृहातून एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले. तेव्हा अजित पवार यांनी पुन्हा सलोख्याने घेण्याचा सल्ला दिला होता. यावेळी ही शिवसेनेतील काही नेते नाराज झाले होते. पवार पुढे म्हणाले होते की, आमदारांना काही तास किंवा एक दिवसासाठी बेशिस्त वर्तनासाठी शिक्षा होऊ शकते, त्यासाठी १२ महिने त्यांनी निंलबित करण्याची गरज नाही.

Uddhav Thackeray : सेनेचेच सैनिक पुढे येऊन काम करतात

२८ मार्च राेजी राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट करून कौतुक केले. मोदींना लोकांनी कौल दिला आहे. त्यांच्यात काही तरी चांगले गुणे असावेत किंवा ते चांगली कामे करत असावेत. मात्र ती विरोधकांना शोधता येत नसावीत, असे मेमन यांनी ट्विट केले होते. यावर शिवसेनेच्या नेत्यांनी खंत व्यक्त केल्याचे समजते.

भाजपकडून वारंवार महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे. परंतू शिवसेनाच पुढे येऊन लढत आहे. ही जबाबदारी फक्त सेनेचीच नाहीतर राष्ट्रवादी आणि घटक पक्षांची आहे परंतू सेनेचेच सैनिक पुढे काम करत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी पूर्णपणे मागे पडल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीनं ज्याप्रकारे भाजपशी दोन हात करायला हवेत, तसे त्यांच्याकडून होताना दिसत नाही, असे शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

गृह खाते राष्ट्रवादीकडे त्यांनी आक्रमक व्हावे

महाविकास आघाडीतील तिनही पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपकडून टार्गेट केले जात आहे. परंतू गृह मंत्रालय राष्ट्रवादीकडे आहे. त्यांच्याकडून अपेक्षित काम होताना दिसत नसल्याचे शिवसेनेतील सुत्रांनी सांगितले. तर आम्ही भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. पण शिवसेनेच्या काही नेत्यांना राष्ट्रवादीने आणखी आक्रमक व्हावे असे वाटते. गृह मंत्रालय आमच्याकडे आहे, असे राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितलं.

सेनेच्या एका नेत्याने पुढे सांगितले की, राष्ट्रवादी आणि भाजप नेते यांच्यात काही वैयक्तिक संबंध आहेत. यामुळे ते एकमेकांवर हल्ला करण्यापासून परावृत्त करण्याचे संभाव्य कारण असू शकते. मुख्यमंत्री नाखूष आहेत मुख्यमंत्र्यांनी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना कळवले आहे, येत्या काही दिवसांत बदल होतील असेही ते म्हणाले.

मागच्या ५ वर्षात राज्यात भाजपची सत्ता होती त्या काळात भाजपने केलेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड करण्याबाबत विचार केला जात आहे. याचबरोबर अन्य बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे असे नाव न सांगण्याच्या अटीवर महाविकास आघाडीतील एका मंत्र्यांने इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news