मुंबई: दादर येथील ड्रेनेजमध्ये अडकली गाय | पुढारी

मुंबई: दादर येथील ड्रेनेजमध्ये अडकली गाय

मुंबई पुढारी वृत्तसेवा: दादरच्या भवानी शंकर रोडवरील ड्रेनेजमध्ये एक गाय अडकल्याची दुर्घटना सकाळी घडली. तिला वाचवण्यासाठी घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दादरच्या भवानी शंकर रोडवरील नजीकच्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गाय अडकली. नागरिकांनी या घटनेची माहीती अग्निशामक दलाला दिली असता, घटनास्थळी मुंबई महापालिका  अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि बचाव कार्यगट घटनास्थळी दाखल झाले.

येथील स्थानिक नागरिक, महापालिका कर्मचारी आणि अग्निशमन दल गायीला सुखरूपरीत्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान  सकाळची वेळ असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे बचाव कार्यातही अडचण येत आहे.

हेही वाचलं का?

Back to top button