प्रवीण दरेकरांची याचिका फेटाळली; अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

प्रवीण दरेकरांची याचिका फेटाळली; अटकपूर्व जामीन देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत कोणताही दिलासा दिलेला नाही. न्यायालयाने याचिका फेटाळताना सत्र न्यायालयात रितसर अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले. प्रवीण दरेकर यांच्या जामीन अर्जाला राज्य सरकारने कडाडून विरोध केला.

प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री मजूर सहकारी सोसायटी प्रकरणात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. प्रवीण दरेकर यांच्यावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ विरोधकांकडून विधान परिषदेत आज गोंधळ घालण्यात आला. तीनदा गोंधळ घातल्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांची फिर्याद नोंदवून घेत माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवी कलम 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120 (ब) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर हे मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून उभे राहिले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

हे ही वाचलं का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news