ajit pawar : देवेंद्र फडणवीसांच्या निधी वाटपाच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर | पुढारी

ajit pawar : देवेंद्र फडणवीसांच्या निधी वाटपाच्या आरोपांवर अजित पवारांचे उत्तर

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मागील दोन वर्षात कोरोनामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीला मोठा फटका बसला. यामुळे राज्याच्या महसुलात मोठी वाढ झाली नाही. तसेच कोरोनाला अद्यापही आपण हलक्यात घेणे चुकीचे आहे, कारण ज्या चीनमधून कोरोना आला त्या चीनमध्ये अद्यापही काही शहरे लॉकडाऊनच्या स्थितीत आहेत. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना सांगितले. (ajit pawar)

मागील काही दिवसांपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आले. यावर अजित पवार काही बोलतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. परंतु अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर झालेली कारवाई तसेच दरेकर आणि बावनकुळे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावर भाष्य करण्याचे टाळले.

पवार पुढे म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणल्यानंतर मागच्या वर्षाच्या तुलनेत राज्याची ३३ टक्के महसुलाल वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच जीएसटीच्या परताव्यात ही वाढ झाली आहे. यामुळे राज्याच्या महसुलात वाढ होत असल्याने अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याचबरोबर जिल्हा वार्षीक निधीसाठी सरकार आता प्रयत्नशिल असल्याचे पवार म्हणाले. (ajit pawar)

Back to top button