‘लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम सुरू, कितीही गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही हटणार नाही’ | पुढारी

'लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम सुरू, कितीही गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही हटणार नाही'

मुंबई : पुढारी ऑनलाईन : मुंबै बँक घोटाळा प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई सुडबुध्दीने करण्यात आलीय. जाणीवपूर्वक दरेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही, असे म्हणत त्यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं आहे. विधानसभेत मुंबै बँक घोटाळा, शेतकऱ्यांची वीज आणि नवाब मलिकांचा राजीनामा असे विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले.

फडणवीस म्हणाले, ‘सरकारकडून लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम सुरू आहे. कितीही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही हटणार नाही. शेतकऱ्यांबाबत ठाकरे सरकारला कोणतीही संवेदना नाही. मागील अधिवेशनात दिलेलं आश्वासन पूर्ण का होत नाही? सुलतानी पध्दतीने शेतकऱ्यांची वीज कापली गेली. आम्ही न्यायालयात जाणार, आंदोलन करणार. शेतकऱ्यांची वीजजोडणी होईपर्यंत मुद्दा उपस्थित करणार.’

मालिकांबाबत याचिकेचा आज निकाल आलाय. भ्रष्टाचार विरोधात बोलणं बंद करणार नाही. राजीनामा घेतला नाही तर सरकार दाऊदच्या दबावाखाली काम करतंय स्पष्ट होईल. मलिकांविरोधात हायकोर्टाने निर्णय दिलाय. सरकार मलिकांचा राजीनामा कधी घेणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

फडणवीस पुढे म्हणाले, धार्मिक स्वातंत्र्य हे इतर स्वातंत्र्याच्या अधीन राहूनचं आहे. शिक्षणसंस्था नियमानचं चालल्या पाहिजेत. ड्रेसकोडचं कंडक्ट असायला हवं.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. दरेकर बोगस मजूर असल्याचे दाखवत मुंबै बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केला हाेता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

आम आदमी पक्षाने दोन महिन्यांपूर्वी मुंबै बँक, हजारो ठेवीदार व सहकार विभागाची ‘मजूर’ असल्याचे भासवून वर्षानुवर्षे फसवणूक करणारे आमदार व विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

Koo App

मुंबई पोलिसांकडून प्रश्नावली प्राप्त झाल्यावर मी लेखी कळविले होते, की मी उत्तर देणार आहे. नंतर मला नोटीस आली. आधी जे प्रश्न विचारले ते साक्षीदारासाठीचे होते. पण, कालचे प्रश्न हे आरोपी करता येते का, या हेतूने होते. ते कुणी बदलले हेही मला माहिती आहे. (विधानसभा । सोमवार, दि. 14 मार्च 2022) #Maharashtra #BJP #BudgetSession #MaharashtraBudgetSession

Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 14 Mar 2022

Back to top button