

मालाड, पुढारी वृत्तसेवा : चारकोप येथील एकतानगर गल्ली क्रमांक ९, आशिष हॉटेलच्या मागे सार्वजनिक शौचालयाची टाकी साफ करताना ४ कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना आज (गुरुवार) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, एकतानगर येथील शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी ४ कामगार आले होते. ते टाकीत उतरल्यानंतर त्यांचा दम घुसमटून मृत्यू झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ३ मृतदेह बाहेर काढले. मात्र, अजून एक मृतदेह आढळून आला नाही. त्याचा शोध सुरु आहे.
यापूर्वी मालवणी गाव येथे शौचालाच्या टाकीत पडून २ तरुण कामगारांचा मृत्यू झाला होता. अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, पालिका प्रशासन आणि राज्य शासनाने यातून काही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. दरम्यान, मनसे च्या वतीने कंत्राटदारवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. मृतदेह शव विच्छेदनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : घरातल्यांचा जुगनू, कॉमेडीयन आणि 'आप'चा भगवंत | Bhgavant Mann | Aap CM Candidate