संजय राऊत शिवसेना भवनातून उद्या कोणता राजकीय बॉम्ब टाकणार ? | पुढारी

संजय राऊत शिवसेना भवनातून उद्या कोणता राजकीय बॉम्ब टाकणार ?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्या (ता.०८) शिवसेना भवनात सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे.

यापूर्वी शिवसेना भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर पीएमओकडे सुद्धा काही कागदपत्रे सादर केली आहेत. संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून सोमय्या बाप बेटे जेलमध्ये जाणार असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आणखी काही पुरावे सादर करणार का ? याबाबत उत्सुकता आहे.

गोव्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचा संजय राऊत यांचा आरोप

गोव्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. गोव्यात फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न सुरु असून गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.

गोव्यातील नेते सुदीन ढवळीकर, दिगंबर कामत, विजय सरदेसाई यांचे फोन टॅप होत आहेत असे सांगत महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे फोन टॅपिंग घडलं ते गोव्याचे निवडणूक प्रभारी होते, असा अप्रत्यक्ष टोला राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. माझे फोन आताही टॅप होताहेत, असा दावा त्यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा १० मार्चनंतर गोव्यात सक्रिय होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button