Pankaja Munde : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत धक्का नव्हे, धोका! : पंकजा मुंडे | पुढारी

Pankaja Munde : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत धक्का नव्हे, धोका! : पंकजा मुंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओबीसी आरक्षण प्रश्नी आज विधीमंडळात झालेल्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. ओबीसी आरक्षणाशिवीय इथून पुढे एकही निवडणूक होऊ नये, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सरकारचं वेळकाढू धोरण असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याची मानसिकता राज्य सरकारची नाही. सरकारला आरक्षण द्यावे, असे वाटत नाही. ओबीसी आरक्षणाबाबत धक्का नाही, तर धोका देण्यात आलेला आहे, असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले आहे. तसेच आरक्षणाबाबत कोर्टाने दिलेल्या ओव्हरड्यूची व्याख्या सरकारने ठरवावी.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ 

उधवस्त झालेलं तळीये गाव आता कुठल्या अवस्थेत आहे?

Back to top button