Nawab Malik Arrest : ‘सिल्व्हर ओक’वरील बैठक संपली, पुढील चर्चा ‘वर्षा’ बंगल्यावर!

Nawab Malik Arrest : ‘सिल्व्हर ओक’वरील बैठक संपली, पुढील चर्चा ‘वर्षा’ बंगल्यावर!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik Arrest ) यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. अटकेनंतर मलिक यांना ईडीने कोर्टात हजर केले. मलिक यांना जामीन मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, मंत्री मलिक यांच्या अटकेनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली. यावेळी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.

मलिक ( Nawab Malik Arrest ) यांच्या अटकेनंतर शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री छगन भूजबळ, मंत्री राजेश टोपे यांच्यामध्ये या प्रकरणास सामोरी जाण्याचा तसेच महाविकास आघाडी म्हणून ईडीद्वारे केंद्र आणू पहात असलेल्या दबावाला कसे ताेंड द्यावे. तसेच या दबावास एकत्र तिन्ही महाविकास आघाडीतील पक्षम्हणून एकत्ररीरित्या सामारे जाण्यावर चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.

या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सर्व नेते वर्षा बंगल्यावर पोहचले आहे. या ठिकाणी या प्रकरणावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

हसिना पारकरचा ड्रायव्हर सलीम पटेल यांच्याकडून मलिकांनी मालमत्ता विकत घेतली असल्याचा आरोप ईडीकरुन करण्यात आला आहे. पण, सलीम पटेल नावाचे दोन भिन्न व्यक्ती असल्याचा दावा मलिकांच्या वकीलांनी केला आहे. ईडी कडून अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबधीत मालमत्तेप्रकरणी मुंबईमध्ये छापे टाकण्यात आले होते. या प्रकरणामध्येच ईडीने मनीलॉन्ड्रींग मंत्री नवाब मलिक यांची चौकशी सुरु केला आहे. बुधवारी आठतासांच्या चौकशी नंतर ईडीने नवाब मलिक यांना ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news