Somaiya Vs Raut : “किरीट सोमय्या नेल्सन मंडेला नसून देशातील सर्वात मोठा चोर”

Somaiya Vs Raut : “किरीट सोमय्या नेल्सन मंडेला नसून देशातील सर्वात मोठा चोर”
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे आज रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या कोर्लई गावातील जागेवरील १९ बंगल्याच्या शोधासाठी जाणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष दिसण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांचा 'वेडसर', असा उल्लेख केला आहे. (Somaiya Vs Raut)

संजय राऊत हे मुंबई पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, "कोण आहेत किरीट सोमय्या? वेडा माणूस इकडे-तिकडे फिरत आहे. ते जेलमध्ये जाणार आहेत, त्यामुळे ते रस्ता शोधत आहेत. ते इथे तिथे पळत आहेत. येथील जनताच त्यांची धिंड काढतील, वेट अँण्ड वॉच… कुठे जातात, बंगले शोधतता ही काय बातमी आहे का? बंगले कुठे आहेत दाखवा, आम्ही सांगितलं आहे. त्यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. त्यांची बेनामी संपत्ती कुठे असेल तर ती स्वप्नात दिसत असेल", अशी प्रतिक्रिया संजय राऊत दिली आहे.

"यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. तेथील जमिनीवर एकही बांधकाम, बंगला नाही. यांना स्वप्नात बंगले दिसत आहेत. भाजपच्या लोकांना बहुतेक भुताटकीने झपाटलं आहे. त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली यासंबंधी हे लोक बोलत नाहीत. पण अन्वय नाईक यांना ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सगळे लोक कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते", असंही त्यांनी सांगितलं आहे.

यावेळी संजय राऊत यांनी गंभीर आरोपही केलेले आहेत. ते म्हणाले, "अन्वय नाईकसारखा एक मराठी माणूस, उद्योजक यांनी भाजपाच्या दबावामुळे आत्महत्या केली, कारण हे लोक अर्णब गोस्वामीला वाचवत होते. किरीट सोमय्यांनीदेखील अन्वय नाईक यांना अर्णब गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, बिल पाठवायचं नाही यासाठी धमकावल्याची माझ्याकडे माहिती आहे. दोन वेळा बोलावून त्यांना धमकावण्यात आलं. त्यानंतर ही आत्महत्या झाली आहे. भाजपच्या लोकांनीच त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं", असा गंभीर आरोप राऊत यांनी भाजपवर केला आहे. (Somaiya Vs Raut)

"भाजपचे लोक महाराष्ट्र आणि मुंईबतून मराठी उद्योजकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्व अन्वय नाईकचे हत्यारे असून आणि त्यांच्यातील एक हत्यारा त्या जमिनीवर चालला आहे. किरीट सोमय्या हे काही नेल्सन मंडेला नसून देशातील सर्वात मोठा चोर, लफंगा, डाकू आहेत", असं संजय राऊत म्हणाले. यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बाप आणि बेटे जेलमध्ये जातील असा इशारा दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news