मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात ४ ठार; स्विफ्ट कार दोन मोठ्या वाहनांमध्ये अडकून चक्काचूर

लोणावळा; पुढारी वृत्तसेवा : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात खोपोली हद्दीत क्र. 40 येथे आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास 6 वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक स्विफ्ट कारचा दोन मोठ्या वाहनांमध्ये अडकून चक्काचूर झाला असून त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
शिवाय इतर वाहनांमधील 3 जण गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये दोन कंटेनर, दोन कार, टेम्पो व ट्रक अशा सहा वाहनांचा हा अपघात आहे. हे सर्व वाहने मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. पुण्याहुन मुबंईकडे जाणाऱ्या कंटेनरचा खंडाळा बोरघाटात आडोशी बोगद्याजवळ आला असता ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील वाहनांना जोरदार धडक दिली.
भाजपचे साडे तीन नेते कोण ! संजय राऊत आज कोणता बॉम्ब टाकणार ? https://t.co/UkYNOjtyrO #SanjayRaut #ShivSena #BJP #pudhari #pudharinews #pudharionline @rautsanjay61
— Pudhari (@pudharionline) February 15, 2022
घटनेची माहिती समजताच आयआरबी, देवदूत यंत्रणा, लोकमान्यची यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीला संस्थेचे पथक, बोरघाट व खोपोली पोलीस यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत व जखमी लोकांना वाहनांमधून बाहेर काढून जखमी प्रवासाना एमजीएम रुग्णालयात पाठवून देण्यात आले आहे. सर्व वाहने बाजुला काढली आहे. आता या मार्गावरील वाहतूक पुर्वपदावर येत आहे. मात्र अपघात झाल्यानंतर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
हे ही वाचलं का
- भाजपला कानोसा लागू न देता एमएनजीएलने उरकला कार्यक्रम, गॅसजोडणीस प्रारंभ
- इचलकरंजी : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीचा करार सहा वर्षांपासून कागदावरच..!
- कणकवली : मैत्रिणीला फोन केल्याच्या रागातून युवकावर ब्लेड हल्ला