

- सुशांत सावंत (मुंबई)
Mayor Reservation Lottery 2026: राज्यातील महानगरपालिकांसाठी आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरला आहे. महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापौरपदावर नेमकं कोण बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज मोठा निर्णय झाला असून राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
ही सोडत मंत्रालयात जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गाला महापौरपद मिळणार, हे स्पष्ट झालं आहे. यामध्ये मुंबई महापालिकेच्या महापौरपदाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
आज जाहीर झालेल्या सोडतीनुसार—
राज्यातील 29 पैकी 1 महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलं आहे.
3 महापौरपदे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष आरक्षणाचा समावेश राहणार आहे.
महापालिका अधिनियम 2006 नुसार 8 महापालिकांमध्ये महापौरपद ओबीसीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. यामध्ये महिला आणि पुरुष आरक्षणाचा समावेश आहे.
उर्वरित 17 महापौरपदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष आरक्षणाचा समावेश आहे.
कल्याण डोंबिवली - एसटी
लातूर - अनुसूचित जाती (महिला)
जालना - अनुसूचित जाती (महिला)
ठाणे - अनुसूचित जाती
पनवेल - ओबीसी
इचलकरंजी - ओबीसी
अकोला - ओबीसी (महिला)
अहिल्याबगर - ओबीसी (महिला)
उल्हासनगर - ओबीसी
कोल्हापूर - ओबीसी
चंद्रपूर - ओबीसी (महिला)
जळगांव - ओबीसी (महिला)
मुंबई - खुला प्रवर्ग (महिला)
पुणे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
छत्रपती संभाजीनगर – खुला प्रवर्ग (महिला)
धुळे महानगरपालिका – खुला प्रवर्ग (महिला)
अमरावती – खुला प्रवर्ग (महिला)
भिवंडी-निजामपूर – खुला प्रवर्ग
मालेगाव – खुला प्रवर्ग (महिला)
मीरा-भाईंदर – खुला प्रवर्ग (महिला)
नागपूर – खुला प्रवर्ग (महिला)
नांदेड-वाघाळा – खुला प्रवर्ग (महिला)
पिंपरी-चिंचवड – खुला प्रवर्ग
नाशिक – खुला प्रवर्ग (महिला)
नवी मुंबई – खुला प्रवर्ग (महिला)
परभणी – खुला प्रवर्ग
सांगली-मिरज – खुला प्रवर्ग
वसई-विरार – खुला प्रवर्ग
सोलापूर – खुला प्रवर्ग
आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर आता प्रत्येक महापालिकेत—
कोणत्या पक्षाला महापौरपद मिळू शकतं
कुणाला उमेदवारी द्यायची
कोणत्या शहरात कोणता पक्ष दावा करणार
याबाबत पक्षांतर्गत बैठकांना आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत आज जाहीर झाली आहे. यामध्ये ST साठी 1, SC साठी 3, ओबीसीसाठी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 17 जागा ठेवण्यात आल्या आहेत. आता महापौरपदासाठी राजकीय गणितं बदलणार आहेत.