BMC Election 2026 | "आमचे नगरसेवक २४ कॅरेट सोनं...." : काँग्रेस नेत्‍या वर्षा गायकवाडांनी सत्ताधार्‍यांवर साधला निशाणा

भाजपमध्ये दडपशाही सुरू; पण आमच्या पक्षात लोकशाही जिवंत
Varsha Gaikwad on BMC Election 2026
काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडFile Photo
Published on
Updated on

Varsha Gaikwad on BMC Election 2026

मुंबई : मुंबईतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. "आमचे विजयी नगरसेवक हे २४ कॅरेटचे शुद्ध सोनं आहेत, त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये कोंडून ठेवण्याची आम्हाला गरज भासली नाही," अशा शब्दांत गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

'खऱ्या सोन्याला कशाचीही भीती नाही'

माध्‍यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्‍या की, " काँग्रेस पक्षाचे मुंबईत २४ नगरसेवक निवडून आलेले आहेत, ते २४ कॅरेटचं सोनं आहे; त्यामुळे आम्हाला कुठल्याही हॉटेलमध्ये त्यांना ठेवायची गरज पडलेली नाहीये. कुठल्याही ठिकाणी त्यांच्यावरती कुठलाही दबाव चालू शकत नाही आणि खऱ्या सोन्याला काय त्या ठिकाणी बदलता येत नाही. खरं सोनं, खरं सोनंच राहतं."

Varsha Gaikwad on BMC Election 2026
BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत भाजपसोबत छुपी युती? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

संघर्षातून मिळालेला विजय

नगरसेवकांच्या कष्टाचे कौतुक करताना वर्षा गायकवाड म्‍हणाल्‍या की, आमच्या कुठल्याही नगरसेवकाचं दबाव आहे, असे तुम्ही ऐकलं का? त्यांना कुठल्याही तऱ्हेने आम्ही हॉटेलमध्ये ठेवलं नाही किंवा त्‍यांच्‍यावर0 कुठलाही दबाव आहे?. आज सगळेजण स्‍वइच्‍छेने येथे आले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, कारण जनतेतून ते निवडून आलेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते निवडून आलेले आहेत. ज्या संघर्षामधून त्यांनी हा विजय मिळवला, हा खरंच त्यांचा खूप खूप मोठा विजय आहे. भाजपमध्ये दडपशाही सुरू आहे, पण आमच्या पक्षात लोकशाही जिवंत आहे."

Varsha Gaikwad on BMC Election 2026
BMC Election 2026 Result: ना महायुती, ना ठाकरे बंधू, धारावीत काँग्रेसचा ‘हात’च भारी! माजी खासदार राहुल शेवाळेंच्या वहिनींचा पराभव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news