जालना; पुढारी वृत्तसेवा: शहरातील काही पेट्रोलपंपावर वाहन चालकांना पेट्रोल व डिझेल देताना कामगार दिलेल्या पैशापेक्षा कमी पेट्रोल व डिझेल टाकून चोरी करीत असल्याचा प्रकार सुरू आहे. जिल्ह्यात एकीकडे पेट्रोल व डिझेलचे भाव वाढलेले असतानाच दुसरीकडे पेट्रोल पंपावरील कामगार मापात पाप करीत असल्याने ग्राहकांचा खिसा कापला जात आहे.
याबाबत अनेकदा ग्राहक व कामगारांत पेट्रोल कमी दिल्याने वाद होतात. पेट्रोल देताना मीटर जम्प करणे, दिलेल्या पैशापेक्षा 40 ते 50 पैसे कमी पेट्रोल टाकणे या व यासारखे प्रकार सर्रास सुरु आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष नसल्याने कामगार पेट्रोल चोरीचे प्रकार थांबविण्यास तयार नाहीत. संबंधित कंपनी व पुरवठा विभागाने पेट्रोल पंपावरील कॅमेरे व मापाची तपासणी करणे गरजेचे आहे.
हेही वाचलंत का?