जालना : शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला | पुढारी

जालना : शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

जालना ; पुढारी वृत्तसेवा ः शहरात पडत असलेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. पालिकेने विविध वॉर्डात धूर फवारणीसह औषधी फवारणी गरजेची आहे.

पावसाळा लक्षात घेऊन नालेसफाईसह सांडपाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. नसता डेंग्यूसह चिकुनगुणिया व विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button