

भोकरदन, पुढारी वृत्तसेवा ः भोकरदन तालुक्यातील राजूर येथील तलाठी अण्णा विठोबा कड यांना तक्रारदाराच्या प्लॉटचा सातबार्यावर फेर घेण्यासाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने राजूर तलाठी कार्यालयात पकडले. तक्रारदाराने राजूर येथे प्लॉट घेतला असून सदर प्लॉटचा सात बारावर फेरची नोंद घेण्यासाठी तलाठी कड यांनी तक्रारदारास 15 हजार रुपये लाचेची मागणी करून त्यांना फेर बाबत बाँड आणायला सांगितले होते.
23 जून रोजी तक्रारदार यांनी फेर घेण्यासाठी बाँड आणून दिल्यानंतर तलाठी कड यांनी तक्रारदार यांच्याकडून त्यांच्या प्लॉटची नोंद सातबारा वरती घेण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना त्यांना रकमेसह लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी तलाठी कड यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपाधीक्षक सुदाम पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलिस कर्मचारी गजानन घायवट, गजानन कांबळे, गणेश भुजाडे यांनी केली.
हेही वाचलंत का?