पिंपरी : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर | पुढारी

पिंपरी : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसेना रस्त्यावर

पिंपरी : शिवसेना नेते व राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले असून आपल्याकडे 45 आमदार असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शहर शिवसेनेने मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ गुरुवारी (दि.23) आंदोलन केले. भाजप व सेना आमने सामने आले.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात झालेल्या शिवसेनेच्या आंदोलनात शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, युवा सेनेचे पदाधिकारी विश्वजीत बारणे, शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, सरिता साने, अनिता तुतारे, राजेश वाबळे, बाळासाहेब वाल्हेकर, गणेश आहेर आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. उद्धवसाहेब आम्ही तुमच्या सोबत, शेवटच्या श्वासापर्यंत आहोत, अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या.

दरम्यानच्या काळात विधानपरिषदेवर निवडून आलेल्या आलेल्या भाजपच्या नवनिर्वाचित आमदार उमा खापरे या रॅलीने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आल्या. त्यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना अंगार है बाकी सब भंगार है, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. तर भाजपा कार्यकर्त्यांनीही देवेंद्र फडणवीस व भाजपच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्या.

Back to top button