उस्मानाबाद : तलवारी बाळगणार्‍या दोघांना अटक

उस्मानाबाद : तलवारी बाळगणार्‍या दोघांना अटक

उस्मानाबाद : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांत तलवारी बाळगणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले, की कंटेकूर (ता. उमरगा) येथील विकास दिलीप सातलगे याच्या घरात लपवून ठेवलेली तलवार जप्त केली. धान्याच्या पोत्यात त्याने ती लपवून ठेवली होती. त्याच्यावर मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तर सावरगाव (पू., ता. कळंब) येथील अमोल हरिभाऊ पवार याच्या घरातूनही तलवार जप्त करण्यात आली आहे. त्याच्यावर कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news