जालना : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या | पुढारी

जालना : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

जालना ः येथील लक्ष्मीनारायणपुरा भागात राहणार्‍या ऋषिकेश सत्यकुमार चिप्पावर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

ऋषिकेश चिप्पावर याने काही व्यक्तींकडून उसने पैसे घेतल्याची चर्चा असून त्या पैशांसाठी संबंधित व्यक्‍तींनी त्याच्याकडे वसुलीचा तगादा लावला होता. या व्यक्तींनी ऋषिकेशची दुचाकी आणि मोबाईलही जप्त केल्याचा आरोप आहे. या मानसिक त्रासातून त्याने बुधवारी सायंकाळी 6 वाजता घरातून बाहेर येऊन चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गळफास घेत आत्महत्या केली.

दरम्यान, संबंधित व्यक्‍तींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह चंदनझिरा पोलिस ठाण्यात आणला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button