परभणी : ताडकळस येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

परभणी : ताडकळस येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ताडकळस; पुढारी ऑनलाईन : ताडकळस येथून जवळच असलेल्या फुलकळस (ता. पुर्णा) येथे गुरूवारी (दि. ३) रोजी सकाळी ११ते १२ च्या दरम्यान स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्याचे गजानन लक्ष्मण शिराळे (वय २५, रा. फुलकळस) असे आहे. या युवकाने आत्महत्या का केली याची माहिती अध्याप मिळलेली नाही.

याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, गजानन शिराळे गहा आज सकाळी जनावरांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेला होता. बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने त्याचा भाऊ शिवहार लक्ष्मण शिराळे (वय २१) हा शोधण्यास शेतात गेला. यावेळी त्याला गजाननने शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

यानंतर शिवहार याने यांची माहिती ताडकळस पोलीस ठाण्यास दिली. ताडकळस पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत सदर घटनेचा पंचनामा केला आहे. गजाननचा मृतदेहावर आरोग्य केंद्रातील डॉ. वसंत कांबळे यांनी शवविच्छेदन केले. रात्री उशिराने त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

या घटनेचा पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय रामोड, प्रभाकर राठोड, धनंजय कणके हे करीत आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news