वाशिम: पोहरादेवी येथील संजय राठोड यांच्या बैठकीकडे सुनील महाराजांची पाठ

वाशिम: पोहरादेवी येथील संजय राठोड यांच्या बैठकीकडे सुनील महाराजांची पाठ

वाशिम; पुढारी वृत्तसेवा: वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे आज (दि.14) जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील नंगारा वास्तुसंग्रहालय सभागृहात श्रीसंत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी कामाला गती देण्यासाठी पालकमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.

या बैठकीपूर्वी पालकमंत्री राठोड पोहरादेवी येथील सर्व महंताच्या मठाला भेट देत दर्शन घेतले. नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत गेलेले पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी यावेळी मंदिर परिसरात येणं व पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेणं टाळलं. त्यापूर्वी पोहरादेवी धर्मगुरू बाबूसिंग महाराज, कबीर महाराज, शेखर महाराज, जितेंद्र महाराज यांचे दर्शन घेतले. तसेच हे सर्व महंत या आढावा बैठकीला हजर होते.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news