Rudraksh Patil : रुद्राक्ष पाटीलची सुवर्णकामगिरी; नेमबाजीत सुवर्णपदक पटकावत पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट केले निश्चित | पुढारी

Rudraksh Patil : रुद्राक्ष पाटीलची सुवर्णकामगिरी; नेमबाजीत सुवर्णपदक पटकावत पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट केले निश्चित

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा नेमबाज रुद्राक्ष पाटील याने शुक्रवारी (14 ऑक्टोबर) कैरो येथे झालेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तो 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत चॅम्पियन ठरला. दिग्गज नेमबाज अभिनव बिंद्रानंतर अशी कामगिरी करणारा रुद्राक्ष पाटील हा दुसरा भारतीय नेमबाज ठरला आहे. या विजयासह रूद्राक्ष पाटीलने पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे. रुद्राक्ष पाटीलने इटलीच्या डॅनिलो डेनिस सोलाझोचा 17-13 असा पराभव केला.

काही काळ रुद्राक्ष पाटील हा अंतिम सामन्यात पिछाडीवर होता, परंतु, त्याने शानदार खेळाचे प्रदर्शन करत सामना जिंकला. रुद्राक्ष प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभागी झाला होता. सामन्यात एका वेळी तो 4-10 ने पिछाडीवर होता. फायनलमध्ये विरोधी नेमबाजाने आघाडी कायम ठेवली होती, पण शेवटी रुद्राक्षने जोरदार पुनरागमन केले आणि विजेतेपद पटकावले.

रुद्राक्षने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावले होते आणि क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर राहून ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. बीजिंग ऑलिम्पिक चॅम्पियन अभिनव बिंद्राने 2006 मध्ये क्रोएशियातील झाग्रेब येथे 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जागतिक विजेतेपदाचे सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा;

Back to top button