हिंगोली : वसमतमध्ये महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची चेन पळवली

file photo
file photo
Published on
Updated on

हिंगोली – पुढारी वृत्तसेवा : वसमत येथील कवठा रोड भागात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पळविल्याची घटना सोमवारी सकाळी साडेसहा वाजता घडली आहे.

वसमत शहरातील बँक कॉलनी भागात अलका रमेश निलावार यांचे घर आहे. अलका या दररोज मॉर्निंगवॉकसाठी जातात. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्या मॉर्निंगवॉकसाठी कवठा रोड भागात गेल्या होत्या. यावेळी त्या एकट्या असल्याचे पाहून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चेन ओढून घेतली. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी पलायन केले.

दरम्यान अचानक झालेल्या या प्रकारामुळे अलका या घाबरून गेल्या. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र तिथे कोणीही नव्हते तर चेन ओढल्यानंतर दुचाकीस्वार पसार झाले.

या प्रकरणात अलका यांनी वसमत शहर पोलिस ठाण्याला माहिती दिली त्यावरून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक भिंगारे, जमादार प्रशांत मुंडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजेची तपासणीदेखील केली. यामध्ये एका दुचाकीवर दोन तरुण तोंड बांधून आल्याचे आढळून आले. या प्रकरणात वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news