

[tie_slideshow]
[tie_slide] बातमी 1 | छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत, भर पावसाळ्यात धावतायेत ९९ टँकर [/tie_slide]
[tie_slide] बातमी 2 | पीएसआय परिक्षेचा रखडलेला निकाल जाहीर; संभाजीनगरमधील सुनील महाराष्ट्रातून पहिला | MPSC PSI Result [/tie_slide]
[tie_slide] बातमी 3 | छत्रपती संभाजीनगर : बैलजोड्यांच्या किमती वाढल्याने शेतात नांगरणीसाठी घोड्यांनाच जुंपले [/tie_slide]
[/tie_slideshow] छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जून महिना गेला, आता जुलै महिन्याचा पहिला आठवडाही संपत आला, तरी मराठवाडा कोरडाच आहे. मान्सूनच्या उशिराने आगमनानंतर किरकोळ बरसल्यानंतर पाऊस गायब झाला असून, 4 जुलैपर्यंत विभागात 158 मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित आहे, मात्र आतापर्यंत केवळ 66.3 मिमी (42 टक्के) पाऊस झाला असल्याने चिंता वाढल्या आहेत. गेल्या वर्षी आतापर्यंत विभागात 161.8 मिमी (102.4 टक्के) पाऊस बरसला होता.
[toggle title="दीड महिन्यानंतरही पावसाची ओढ" state="close"]भर पावसाळ्याच्या दीड महिन्यानंतरही पावसाने ओढ दिल्याने शेतकरीवर्ग त्रस्त आहे. किरकोळ पावसाच्या भरवशावर पेरण्या केलेले शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत. जून महिन्यात सरासरी केवळ 7 दिवस पाऊस मराठवाड्यात बरसला, आता जुलै महिन्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.[/toggle]
[toggle title="सर्वात कमी पाऊस हिंगोलीत " state="close"]विभागात आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत 58.8 टक्के, जालना 42.9, बीड 46.9, लातूर 49.5, धाराशिव 44.5, नांदेड 27.8, परभणी 32.5, हिंगोली 23.8 टक्केच पाऊस झाला आहे. विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत 679.5 मिलिमीटर अपेक्षित पाऊस आहे, त्या तुलनेत आतापर्यंत झालेल्या पावसाचा टक्का केवळ 9.8 आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, तर सर्वांत कमी पाऊस हिंगोली जिल्ह्यात झाला आहे. [/toggle]
[toggle title="85 गावे, 24 वाड्या तहानलेल्या " state="close"]पावसाने ओढ दिल्यामुळे विभागात पिण्याच्या पाण्याच्याही अडचणी आहेत. चार जिल्ह्यांतील 85 गावे आणि 24 वाड्यांची तहान टँकरद्वारे भागवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण तुलनेत चांगले असले, तरी टँकरचा धुरळा सुरू आहे, जिल्ह्यात 37 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर जालना 44, हिंगोली 12 तर नांदेड जिल्ह्यात 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.[/toggle]
हेही वाचा :