Chitra Wagh vs Sanjay Raut : ज्यांचा पक्षच ‘फूलआऊट’ त्यांना सारं वाटतं ‘डाऊटफूल’ : चित्रा वाघ यांचा ठाकरे गटाला टोला

Chitra Wagh vs Sanjay Raut : ज्यांचा पक्षच ‘फूलआऊट’ त्यांना सारं वाटतं ‘डाऊटफूल’ :  चित्रा वाघ यांचा ठाकरे गटाला टोला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्‍ट्रवादी काँग्रेसमधील फूटीनंतर राज्‍यातील राजकीय घडामाेडी कमालीच्‍या वेगावल्‍या आहेत. राष्‍ट्रवादी  कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विरोधी पक्ष भाजपवर निशाणा साधताना दिसत आहे.  शिवसेना ठाकरे गटाने 'सामना'च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजपवर 'एक फुल, दो हाफ' अशा शब्दात हल्लाबोल केला आहे. या टीकेला भाजपच्‍या नेत्‍या चित्रा वाघ यांनी प्रत्‍युत्तर दिले आहे. (Chitra Wagh vs Sanjay Raut)

Chitra Wagh vs Sanjay Raut : 'एक फुल, दो हाफ'

'सामना'च्‍या अग्रलेखात नमूद केले आहे की, भाजपने महाराष्ट्रात जे काही केले त्‍यांचीच संपूर्ण देशात बदनामी हाेत आहे. आता फक्त मेहुल चोक्सी, नीरव मोदी, विजय मल्ल्या यांनाच त्यांच्या पक्षात सामील करून पदे द्यायचे बाकी राहिले आहे. या तिघांपैकी एकाची पक्षाच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी, दुसर्‍याची नीती आयोगावर आणि तिसर्‍याची देशाच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नियुक्ती करावी. कारण भ्रष्टाचार, लूट, नैतिकता हा त्यांच्यापुढे मुद्दा राहिलेला नाही. देवेंद्र फडणवीस वारंवार अजित पवारांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात जावे लागेल असे सांगत होते, परंतु त्यांच्या उपस्थितीत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री होते, नंतर शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री झाले. आता अजित पवारही पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे फडणवीस अर्धे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. महाराष्ट्राची ही अवस्था 'एक फुल, दो हाफ' अशी झाली आहे, पण जे फुल आहेत तेही चिंताग्रस्त चेहऱ्याने फिरत आहेत, असेही अग्रलेखात म्‍हटले आहे.

 सारं काही 'डाऊटफूल : चित्रा वाघ

भाजप नेत्‍या चित्रा वाघ यांनी ट्विटमध्‍ये म्हटलं आहे की, "ज्यांचा पक्षच 'फूलआऊट' झालाय, त्यांना सारं काही 'डाऊटफूल' वाटणं साहजिक आहे. सर्वज्ञानींची खदखद आम्ही समजू शकतो, ये तो ना घर का रहा ना घाट का"?

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news