पैठण : व्यापाऱ्याचे घर फोडून चार लाखाहून अधिक सोन्या चांदीच्या दागिन्यावर मारला डल्ला

पैठण : व्यापाऱ्याचे घर फोडून चार लाखाहून अधिक सोन्या चांदीच्या दागिन्यावर मारला डल्ला

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण शहरातील चोरीच्या घटना वाढल्‍या आहेत. या घटना आटोक्यात आणण्यासाठी पैठण पोलीस ठाण्यात नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक यांनी पदभार घेताच चोरट्यांनी एका व्यापाऱ्याचे घर फोडले आहे. जवळपास साडेचार लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरांनी पळवून नेले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पैठण शहरांमध्ये गुरुवारी दि.११ रोजी मध्यरात्री शहराबाहेर असलेल्या शशीविहार कॉलनीत आडत व्यापारी मयूर अरुण चेउलवार यांच्या घरी घरफोडी करून दागिन्यासह रोख रक्कम व एक टू व्हीलर असे एकूण साडेतीन रुपयाचा मुद्देमाल चोरट्याने कंपास केल्याची घटना घडली होती. वारंवार शहरात चोरीच्या घटना घडत असल्याने ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी पैठण पोलीस ठाण्याला साडेसहा महिन्यांनी कायमस्वरूपी संजय देशमुख यांची पैठण पोलीस निरीक्षक पदावर नेमणूक केली.

दरम्‍यान, शहरातील बालाजी विहार येथील औषध विक्री करणारे व्यापारी आकाश लखोटिया यांच्या घरात चोरी करून अज्ञात चोरट्यांनी चार लाख पन्नास हजार रुपयांहून अधिक सोन्या चांदीच्या दागिन्याची चोरी केली आहे. घटनेनंतर पैठण पोलीस ठाण्यात व्यापाऱ्यांने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलीस चोरटयांचा शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news