छत्रपती संभाजीनगर: नवीन दुकानाचा फलक लावताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर: नवीन दुकानाचा फलक लावताना विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

पैठण: पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील भवानीनगर परिसरात नवीन दुकानाचा फलक लावताना विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.३) दुपारी घडली. अनिकेत भानुदास कबाडी (रा. जैनपुरा, पैठण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुकानाचा शुभारंभ करण्यापूर्वीच तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण शहरातील भवानीनगर परिसरात अवर्न एंटरप्राईजेस या नवीन दुकानाचा शुभारंभ अनिकेत कबाडी करणार होता. त्याआधी दुकानाच्या शेडवर चढून आज दुपारी अनिकेत फलक लावीत होता. यावेळी अनिकेतला महावितरणाच्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने त्याला जोराचा धक्का लागला.

या घटनेनंतर काही नागरिकांनी अनिकेतला पैठण येथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळतात महावितरणचे उपविभागीय अधिकारी कल्याण रंधे, सहाय्यक अभियंता रोहित तायडे घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्याच्या सुचना दिल्या. रुग्णालय परिसरात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news