छत्रपती संभाजी महाराजांच्या नावापुढे ‘धर्मवीर’ | पुढारी

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावापुढे 'धर्मवीर'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक की धर्मवीर असा वाद राजकीय पटलावर घडला. सत्ताधारी धर्मवीरसाठी आग्रही असले तरी सरकार दरबारी मात्र स्वराज्यरक्षक असाच उल्लेख होता. त्यात आता बदल करण्यास राज्य सरकारने सुरूवात केली आहे.

छत्रपती संभाजीराजे समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि. पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम ४६ अन्वये विधान परिषदेत हे निवेदन केले.

Back to top button