Parbhani turmeric price - हळदीनं प्रति क्विंटल पंचवीस हजार रुपये गाठला दर, सीझनच्या आधीच मार्केट तेजीत

Parbhani turmeric price- परभणी- हळदीनं प्रति क्विंटल पंचवीस हजार रुपये गाठला दर, सीझनच्या आधीच मार्केट तेजीत
Turmeric
TurmericPudhari photo
Published on: 
Updated on: 

पूर्णा : सध्या पूर्णा आणि वसमत मार्केट कमिटी यार्डात हळदीनं प्रति क्विंटल पंचवीस हजार रुपये दर गाठला असल्याचं पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं नव्हे तर हळदकांडी साठवणूक करुन ठेवलेल्या व्यापाऱ्यांचं चांगभलं होत आहे. यंदा खरीप हंगामात कोरडा दुष्काळ पडल्यामुळे पुरेशा पावसाअभावी हळद पीक धोक्यात आले आहे. उत्पादन निम्म्याहून अधिक घटणार असल्याने हळदीचं मार्केट सिझन आधीच तेजीत आलं आहे.

या मध्य मागील मार्च ते मे एप्रिल महिन्यात हळदीचं उत्पादन हाती आल्यानंतर असंख्य उत्पादक शेतकऱ्यांनी आर्थिक तंगीमुळे आपली हळद १२ ते १४ हजार रुपये क्विंटल दराने हळद विकून टाकली. यातून बोटावर मोजण्या इतक्याच सधन शेतकऱ्यांनी उत्पादित हळद कांडी विक्री न करता घरी किंवा वेअर हाऊस गोदामात साठवणूक करुन ठेवली होती.

अशा अत्यल्प शेतकऱ्यांनाच या दर वाढीव भावाचा फायदा होत आहे. या आधी अल्पभूधारकांनी हंगामात हळद विक्री केलेले शेतकरी आता हात चोळत बसले असल्याचे चित्र आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते मे महिना हा हळद उत्पादन हंगामाचा काळ असतो. या झन मध्य बरेचशे शेतकरी आपल्या आर्थिक अडचणींमुळे मिळेल त्या भावात हळद विकून मोकळे होतात. त्यांचा घरसंसार, मुलाबाळांचे शिक्षण, कपडालत्ता, मुलींचे लग्न कार्य या अडचणींमुळे त्यांना हळद विकावीच लागते. यातून मोठे जमिन क्षेत्र असलेले शेतकरी फक्त सीझन मध्य कमी दरात हळद न विकता साठवणूक करुन ठेवतात.

अशांनाच केवळ ऑफ सीझनमध्ये वाढीव दराचा फायदा होतो. त्याशिवाय, हंगामात गरजवंत शेतकऱ्यांकडून भुसार दुकानदार आणि आडत व्यापारी कवडीमोल दरात हळद खरेदी करुन ती साठवणूक करतात आणि दर वाढलेकी पुढील मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री करुन मोठी फरकाची रक्कम कमावतात. दरम्यान, हळदीच्या बाबतीत ग्रामीण भागात अशी म्हण प्रचलित आहे की, "एक दिवस हळद शेतकऱ्यांचे हात पिवळे करती". परंतु, आता या उलटच हळद व्यापाऱ्यांचेच हात पिवळे होताना दिसत आहे.

Turmeric
Parbhani Protest | परभणी तालुक्यात मृत्यूनंतरही अंत्यविधीसाठी जागेचा संघर्ष; स्मशानभूमीसाठी सरण आंदोलन

काही वर्षी हळदीला भाव नसल्यामुळे बहुतांश शेतकरी हळदपीक उत्पादित करणं सोडून देतात. नेमकं त्याच वर्षी हळदीचे भाव कमालीचे वाढत असतात. अशा वेळी सबंधित शेतकरी आपण उगीच हळद मोडली म्हणून नाराज होतात. सध्या हळद कांडीनं २२ ते २५ हजार रुपये प्रति क्विंटल भाव गाठल्यामुळे मोठे शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

Turmeric
Parbhani ZP | आधी निधीची यादी दाखवा, मगच सर्वसाधारण सभा घ्या! परभणी जिल्हा परिषदेत सदस्य आक्रमक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news