Parbhani ZP | आधी निधीची यादी दाखवा, मगच सर्वसाधारण सभा घ्या! परभणी जिल्हा परिषदेत सदस्य आक्रमक

जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीवाटपावरून गदारोळ; सभेचे कामकाज रात्री उशिरा सुरू
Parbhani ZP
Parbhani ZP Pudhari
Published on: 
Updated on: 

Parbhani Zilla Parishad General Body Meeting

परभणी : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीवाटपावरून शुक्रवारी (दि. ९) परभणी जिल्हा परिषदेत चांगलाच गदारोळ निर्माण झाला. निधीचे वाटप सर्व सदस्यांना समप्रमाणात करावे आणि कोणत्या सदस्याच्या मतदारसंघातील कामांसाठी किती निधी प्रस्तावित आहे, याची संपूर्ण यादी आधी जाहीर करावी, अशी आक्रमक भूमिका सदस्यांनी घेतली. ‘आधी कामांची यादी दाखवा, मगच सर्वसाधारण सभा घ्या,’ असा पवित्रा सदस्यांनी घेतल्याने दुपारी २ वाजता नियोजित असलेली सभा रात्री ७ वाजण्याच्या सुमारास तहकूब करण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी २ वाजता सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सदस्य जिल्हा परिषदेत दाखल झाले. मात्र, सभा सुरू होण्यापूर्वीच डीपीसीच्या निधीतून प्रस्तावित कामांच्या यादीचा मुद्दा उपस्थित झाला. निधीवाटपात कोणत्याही सदस्यावर अन्याय होऊ नये, प्रत्येक सदस्याच्या क्षेत्रातील विकासकामांना समान संधी मिळावी आणि प्रस्तावित कामांची सविस्तर माहिती सर्वांसमोर यावी, अशी मागणी सदस्यांनी केली.

Parbhani ZP
Parbhani News : तुकाराम मुंडेचा मुलगा ‘ओम’ याची ‘रणजी’ संघात निवड! मानवतच्या शिरपेचात मानाचा तुरा

कामांची यादी जाहीर केल्याशिवाय सभेचे कामकाज सुरू करू नये, या भूमिकेवर सदस्य ठाम राहिल्याने सभेला निर्धारित वेळेत सुरुवात होऊ शकली नाही. दुपारनंतरही या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. सायंकाळी ६ वाजल्यानंतरही सभेचे अधिकृत कामकाज सुरू झाले नव्हते. अखेर रात्री ७ वाजण्याच्या सुमारास सभा तहकूब केली.

डीपीसीच्या निधीतून जिल्ह्यातील विविध विकासकामांना आर्थिक तरतूद केली जाते. त्यामुळे कोणत्या भागात कोणती कामे प्रस्तावित आहेत आणि त्यासाठी किती निधी उपलब्ध होणार आहे, याला जिल्हा परिषद सदस्यांच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. निधीवाटपाची प्रक्रिया पारदर्शक असावी, सर्व सदस्यांच्या क्षेत्रांचा विचार व्हावा आणि कोणालाही डावलले जाऊ नये, अशी मागणी सदस्यांनी यावेळी केली.

कामांची यादी सभागृहासमोर ठेवल्यानंतरच सदस्यांना त्यावर आपली भूमिका मांडता येईल, असे सदस्यांचे म्हणणे होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील इतर विषयांवर चर्चा सुरू होण्यापूर्वीच निधीवाटपाचा मुद्दा केंद्रस्थानी आला. परिणामी, सभेच्या कामकाजाला विलंब झाला.

Parbhani ZP
Parbhani Crime | साडेसाती कमी करण्याच्या बहाण्याने वृद्धाची फसवणूक; ४५ हजारांचा ऐवज लंपास

उपाध्यक्षांच्या कक्षात सदस्यांची बैठक

जिल्हा परिषद सभागृहात निधीवाटपाच्या मुद्द्यावर तोडगा निघत नसल्याने उपाध्यक्ष श्रीकांत विटेकर यांच्या कक्षात सर्व सदस्य एकत्र आले. तेथेही डीपीसीच्या निधीतून प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांच्या यादीवर चर्चा झाली. सदस्यांनी संबंधित कामांची यादी वाचून दाखविण्याची मागणी केली. त्यानंतर कक्षात तयार करण्यात आलेल्या कामांच्या यादीचे वाचन करण्यात आले.

यादीतील कामांची माहिती घेताना सदस्यांनी प्रस्तावित कामे आणि निधीवाटपाबाबत चर्चा केली. त्यामुळे एका बाजूला सर्वसाधारण सभा सुरू होण्याची प्रतीक्षा, तर दुसऱ्या बाजूला उपाध्यक्षांच्या कक्षात निधीतील कामांच्या यादीचे वाचन आणि त्यावर चर्चा, असे चित्र जिल्हा परिषदेत पाहायला मिळाले.

डीपीसीच्या निधीवाटपात समानता आणि पारदर्शकता असावी, या मागणीवर सदस्यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेमुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news