Parbhani News | कावलगाव परीक्षा केंद्रावर अनधिकृत पर्यवेक्षक : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, अहवाल सादर करणार

Purna exam center | पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथील उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी बोर्ड परीक्षा केंद्रावर अनधिकृत पर्यवेक्षक आढळल्याने खळबळ
Parbhani News | कावलगाव परीक्षा केंद्रावर अनधिकृत पर्यवेक्षक : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, अहवाल सादर करणार
Pudhari
Published on
Updated on

Purna Kavalgaon exam center unauthorised supervisor case

पूर्णा : तालुक्यातील कावलगाव येथील जय जवान जय किसान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावी बोर्ड परीक्षा सुरू असून, परीक्षा केंद्रावर अनधिकृत पर्यवेक्षक कार्यरत असल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या संदर्भात सविस्तर अहवाल शिक्षण विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर यांनी दिली.

दि. १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट), परभणीच्या विशेष पथकाने परीक्षा केंद्राला भेट देऊन तपासणी केली. पथकातील सदस्य डॉ. अतुल चंद्रमोरे यांनी प्रश्नपत्रिकांचे रॅपर्स, पर्यवेक्षकांची अधिकृत यादी तसेच प्रत्यक्ष कक्षावर कार्यरत असलेल्या पर्यवेक्षकांची पडताळणी केली. यावेळी अधिकृत यादीत नाव नसतानाही एस. एल. पवार या दालन क्रमांक ३ वर पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आढळल्या.

Parbhani News | कावलगाव परीक्षा केंद्रावर अनधिकृत पर्यवेक्षक : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, अहवाल सादर करणार
Parbhani News : तहसीलदारांच्या आदेशाला उच्च न्यायालयाचा ब्रेक

याबाबत केंद्रप्रमुख एस. एल. धुमाळे यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे समजते. संबंधित पर्यवेक्षकांची नियुक्ती कोणी केली आणि कोणाच्या आदेशावर त्यांना पाठविण्यात आले, याबाबत चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी केंद्रप्रमुख धुमाळे यांनी सांगितले की, सुमारे २५० विद्यार्थी बारावी परीक्षा देत आहेत. श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालय, पूर्णा येथील काही शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी शेख एस. टी. यांची उत्तरपत्रिका तपासणीसाठी निवड झाल्याने त्यांच्या जागी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या तोंडी सूचनेनुसार एस. एल. पवार यांना पाठविण्यात आले. तथापि, पवार यांनी नियुक्तीपत्र सादर न केल्याने त्यांचे नाव अधिकृत यादीत नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. नंतर संबंधित नियुक्तीपत्र मंगळवारी प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Parbhani News | कावलगाव परीक्षा केंद्रावर अनधिकृत पर्यवेक्षक : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, अहवाल सादर करणार
Parbhani news |तहसीलदारांच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

गटशिक्षणाधिकारी बालाजी कापशीकर यांनी सांगितले की, संबंधित परीक्षा केंद्र ‘संवेदनशील’ असल्याने स्थानिक शिक्षकांऐवजी पूर्ण्यातील इंदिरा गांधी व श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयातील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. काही शिक्षक अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या ऐवजी पवार यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ९ फेब्रुवारीचे पत्र सादर करण्यात आले आहे. संबंधित महाविद्यालयाचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर तो शिक्षण विभागाकडे सादर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. राजकुमार यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशामुळे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे पर्यवेक्षक नियुक्तीमध्ये घाईगडबड झाली असावी. काही प्राध्यापक अनुपस्थित राहिल्याने पवार यांना पाठविण्यात आले असून, त्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता होती. केवळ यादीत नाव नसल्यामुळे गैरसमज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

Parbhani News | कावलगाव परीक्षा केंद्रावर अनधिकृत पर्यवेक्षक : गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल, अहवाल सादर करणार
Parbhani accident news | अकोली पुलावर अपघातात उज्जैनला निघालेल्या चार भाविकांचा मृत्यू

या प्रकरणी संबंधित अधिकारी आपापले स्पष्टीकरण देत असले तरी, डाएट पथक पुढे कोणती कार्यवाही करणार, याकडे पालक व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news